जावे वृंदावनी, पहाण्या श्रीकृष्ण आणि श्री राधाराणी ।
मनाच्या पंखांनी ।
गगनात उंच उडूनी ॥
जावे वृंदावनी ।
पहाण्या श्रीकृष्ण आणि श्री राधाराणी ॥ १ ॥
गोकुळातील गोड लोणी ।
यमुनेचे निर्मळ पाणी ॥
कोकिळेची मधुर गाणी ।
सारे सांगती श्रीकृष्णाची कहाणी ॥ २ ॥
झोका घेऊनी ।
श्रीकृष्णासंगे खेळूनी ॥
सुंदर पिसारा फुलवूनी ।
मोर नाचले आनंदाने ॥ ३ ॥
ऐकूनी सुमधुर वाणी ।
हर्षिली धरणी ॥
आकाशीची दामिनी ।
अवतरली वृंदावनी ॥ ४ ॥
पहाण्या चक्रपाणी ।
जमल्या सर्व गवळणी ॥
जशी श्री नारायणाची नारायणी ।
तशीच मनमोहनाची मोहिनी ॥ ५ ॥
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२३)