श्रीहरि तारून नेईल भवसागरी नाव ।
साधकांना अनुभूती देऊन त्यांची प्रज्ञा जागृत करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
११.९.२०२१ या दिवशी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण करतांना मला त्यांच्या नारायण स्वरूपाचे दर्शन झाले. ते स्वरूप पुष्कळ विराट आणि प्रकाशमान होते. तेव्हा मला त्या रूपाला पाहून आपोआप एक कविता स्फुरली.
साधक जिवाच्या उद्धारासाठी ।
स्वतः नारायण अवतरला ।
साधक जिवाच्या मोक्षप्राप्तीसाठी ।
श्रीविष्णूला अवतार घ्यावा लागला ॥ १ ॥
जयंतावताराने साधकजिवांच्या मनी ।
रुजवले भावभक्तीचे अंकुर ।
स्वभावदोष नि अहं यांवर मात करायला शिकवूनी ।
केले त्याचे सुंदर फूल ॥ २ ॥
भगवंताच्या या अवतारी लीलेचा भाग बनूनी ।
कृतज्ञताभाव नित्य मनी ठेवूनी ।
घेऊन जाईल श्रीहरि ।
तारून नाव भवसागरी ॥ ३ ॥
कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।
किती व्यक्त करू कृतज्ञता आम्ही ईश्वरा ।
तुम्हाला अपेक्षित प्रयत्न करवून घ्या आता ।
हीच आर्त प्रार्थना माझ्या गुरुवरा ॥ ४ ॥
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |