रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराच्‍या वेळी सांगली येथील सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्‍या अनुभूती

‘१.२.२०२३ ते ५.२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात एक शिबिर झाले. त्‍या वेळी सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सौ. किशोरी मेणकर

१. ‘गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेमुळे आपली इथे येण्‍यासाठी निवड झाली’ असे वाटले.

२. व्‍यासपिठावर चैतन्‍यमय पिवळा प्रकाश दिसणे, श्रीरामस्‍वरूप गुरुदेव आणि मुकुटधारी दोन देवी दिसणे 

‘शिबिर चालू असतांना व्‍यासपिठावर पुष्‍कळ चैतन्‍य आणि पिवळा प्रकाश होता. वक्‍त्‍या डॉ. (सौ.) साधना जरळी, आधुनिक वैद्या (सौ.) अश्‍विनी देशपांडे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) आणि श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांच्‍या मागे लाल रंगाचे वलय होते. त्‍यावर सोनेरी रंगाचे गोल दिसत होते. सर्व अलंकारांनी युक्‍त आणि मुकुट धारण केलेल्‍या दोन देवी म्‍हणजे ‘श्री भवानीदेवी’ आणि ‘श्री विद्या चौडेश्‍वरीदेवी’ उपस्‍थित होत्‍या. श्रीरामस्‍वरूप गुरुदेवांचे अस्‍तित्‍वही जाणवत होते. थोड्या वेळाने पूर्ण सभागृह पिवळे झाले.

३. आश्रमातील चैतन्‍यामुळे शरीर आणि मन ताण विरहित होऊन पुष्‍कळ उत्‍साह अन् हलकेपणा जाणवणे आणि अधिक सेवा करण्‍याचे ठरवणे 

शिबिरामुळे माझे मन स्‍थिर होऊन अंतर्मुख झाले आणि माझी सकारात्‍मकता वाढली. आश्रमातील चैतन्‍यामुळे माझे शरीर आणि मन तणावविरहित झाले. पुष्‍कळ उत्‍साह आणि हलकेपणा जाणवला. ‘गुरुदेवांनी माझी कार्यक्षमता वाढवली असून आम्‍ही सक्रीय होऊन जी सेवा मिळेल, ती स्‍वीकारायची’, असे मी ठरवले.

चैतन्‍यमय वातावरणामुळे गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) वैकुंठात हे लिहून देण्‍याची प्रेरणा मिळाली आणि कृती घडली, त्‍याबद्दल कृतज्ञता.’

– सौ. किशोरी मेणकर, विश्राम बाग, सांगली. (१.२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक