‘नासा’ पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’ उतरवल्यानंतर आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ हीसुद्धा दक्षिण ध्रुवावर यान उतरवणार आहे. वर्ष २०२४ च्या शेवटी हे यान पाठवण्यात येणार आहे. या यानातूनही एक रोव्हर बाहेर येऊन चंद्राचा अभ्यास करणार आहे. नासा याद्वारे चंद्रावर बर्फ शोधणार आहे.

भारताच्या ‘चंद्रयान-१’ने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला होता. हे पाणी बर्फाच्या स्वरूपात असल्याचे आढळून आले होते. हा बर्फ किती प्रमाणात आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी चंद्रावर प्रत्यक्ष उतरून माहिती घेणे आवश्यक आहे.