(म्हणे) ‘उदयनिधी यांना सनातन धर्मावरील त्यांची मते मांडण्याचा अधिकार !’ – अभिनेते कमल हासन

अभिनेते कमल हासन यांच्याकडून उदयनिधी यांनी केलेल्या सनातन धर्मद्वेषी विधानाचे समर्थन !

अभिनेते कमल हासन आणि उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्मावरील त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही त्यांच्या दृष्टीकोनाशी असहमत असाल, तर त्यांना धमकावणे, कायदेशीर गोष्टींत त्यांना अडकावण्याचा प्रयत्न करणे किंवा संकुचित राजकीय लाभासाठी त्यांच्या शब्दांचा विपर्यास करण्याऐवजी सनातन धर्माची वैशिष्ट्ये सांगणारी चर्चा घडवून आणणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हासन यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयीच्या विधानावर ट्वीट करून व्यक्त केली आहे.  (इस्लामच्या विरोधात कुणी मते मांडली, तर त्यांना सर तन से जुदा (शिर धडापासून वेगळे करणे) अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना कमल हासन कधी चर्चा करण्याचा सल्ला का देत नाहीत ? नुपूर शर्मा यांच्या प्रकरणी हासन यांनी तोंड का उघडले नाही ? कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदावर ते का बोलले नाहीत ? – संपादक)

कमल हासन पुढे म्हणाले की, नागरिकांची एखाद्या गोष्टीशी असहमत असण्याची आणि सतत चर्चा करण्याची क्षमता हे खर्‍या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. इतिहासाने आपल्याला वारंवार हे शिकवले आहे की, योग्य प्रश्‍न विचारल्याने अनेक महत्त्वपूर्ण उत्तरे मिळतात आणि एक चांगला समाज म्हणून आपल्या विकासात योगदान दिले आहे.

संपादकीय भूमिका

  • उदयनिधी यांच्या पक्षाची आणि त्यांचे आजोबा करुणानिधी यांची सनातनद्वेषी विचारसरणी राहिली आहे आणि त्या आधारे त्यांचा पक्ष तमिळनाडूत राजकारण करत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आला आहे. सर्वधर्मसमभावाच्या विरोधात वागणार्‍यांना सनातन धर्मावर विद्वेषी विचार मांडण्याचा अधिकार देता येणार नाही !
  • उदयनिधी कधी अन्य धर्मियांच्या संदर्भात त्यांना संपवण्याचे मत मांडण्याचा अधिकार बजावत नाहीत. याविषयी कमल हासन का बोलत नाहीत ?