लोक मांसाहार करत असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये होत आहे ढगफुटी आणि भूस्खलन !
मंडी (हिमाचल प्रदेश) येथील आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांचा दावा !
(ढगफुटी म्हणजे ढग, जे अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.)
शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशमध्ये सातत्याने होणारी ढगफुटी आणि भूस्खलन हे लोक मांसाहार करत असल्याने होत आहे, असा दावा मंडी येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी केले आहे. एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. सध्याच्या पावसाळ्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन आणि पूरस्थिती यांमुळे २३८ हून अधिक लोकांचा जीव गेला आहे.
आईआईटी मंडी के डायरेक्टर लक्ष्मीधर बेहरा ने कहा कि अच्छे इंसान बनने के लिए, आपको क्या करना चाहिए, मांस खाना बंद करें.#HimachalPradesh #IITMandi #LaxmidharBeherahttps://t.co/EbGMhQNWA1
— ABP News (@ABPNews) September 7, 2023
लक्ष्मीधर बेहरा यांनी म्हटले की, जर आम्ही जानवरांना कापणे बंद केले नाही, तर हिमाचल प्रदेशचे पतन होईल. तुम्ही जनावरांना मारत आहात त्यांचा पर्यावरणशी संबंध आहे. तो संबंध तुम्हाला दिसत नाही. वारंवार भूस्खलन, ढग फुटणे आणि इतर अनेक गोष्टी घडत आहेत, हे सर्व प्राण्यांवरील अमानुषतेचे परिणाम आहेत. लोक मांस खातात. ‘चांगला माणूस होण्यासाठी काय करायला हवे ?’, असे विचारत असाल, तर मांस खाणे बंद करा. विद्यार्थ्यांनी मांसाहार न करण्याची शपथ घ्यायाला हवी, असे त्यांनी आवाहन केले.
संपादकीय भूमिकाआयआयटी शिक्षणसंस्थेला जगभरात मान आहे. अशा संस्थेचे संचालक जेव्हा अशा प्रकारचा दावा करतात, तेव्हा त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्याचा गांभीर्याने विचार करून अभ्यास करणे आवश्यक आहे ! |