सातारा जिल्ह्यात लंपी आजारामुळे १३ गुरांचा मृत्यू !
सातारा, ७ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात लंपी आजारामुळे आतापर्यंत १३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. बाधित पशूधनाचा आकडा २०२ हून अधिक झाला आहे. जिल्ह्यात एका वर्षात लंपी रोगाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील २० सहस्रांहून अधिक पशूधन बाधित झाले होते, तर १ सहस्र ४८० गुरांचा मृत्यू झाला होता.