छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाइकांकडून आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना मारहाण !
मिनी घाटी रुग्णालयात तरुणाचा मृत्यू !
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) ३ सप्टेंबर या दिवशी दुपारी अभिजित गजिले (वय २१ वर्षे) यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अतीदक्षता विभागाच्या काचा फोडून आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना मारहाण केली. ‘आधुनिक वैद्यांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे’, असा आरोप नातेवाइकांनी केला. ‘जोपर्यंत आधुनिक वैद्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. (रुग्णाचा मृत्यू आधुनिक वैद्यांच्या चुकीमुळे झाला असेल, तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी; मात्र माहिती न घेता आधुनिक वैद्याला उत्तरदायी ठरवून कायदा हातात घेणे अयोग्य ! – संपादक)
मारहाणीच्या घटनेचा निषेध म्हणून ४ सप्टेंबर या दिवशी आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी काळ्या फिती लावून ‘काम बंद’ आंदोलन केले.