सातारा येथे सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार !
धर्मशिक्षणाच्या अभावी समाजाच्या घसरलेल्या नीतीमत्तेचे उदाहरण !
सातारा, ७ सप्टेंबर (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील एका गावात सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केले. याविषयी वाठार-स्टेशन पोलिसांनी सांगितले की, पीडित अल्पवयीन मुलीचे शिक्षण इयत्ता ७ वीपर्यंत झाले आहे. तिचे आई-वडील मजुरीची कामे करतात. पीडितेचा भाऊ मामाकडे परगावी रहातो. घरात कुणी नसल्याचा अपलाभ घेत भाऊ एके दिवशी घरी आला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ८ मास तिच्यावर असे अत्याचार चालू ठेवले. पीडितेला शारीरिक त्रास झाल्यावर तिची पडताळणी केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अत्याचारी भावाला कह्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे.