अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलिसांची ८ पथके रवाना !
नाशिक येथील हेमंत पारख यांच्या अपहरणाचे प्रकरण
नाशिक – शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अज्ञात व्यक्तींनी २ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या रहात्या घराजवळून अपहरण केले होते. त्यानंतर काही घंट्यांतच पारख हे सुखरूप घरी पोचले; मात्र अपहरणकर्त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी परराज्यासह इतर ठिकाणी पोलिसांची ८ पथके रवाना करण्यात आली आहेत. ‘अन्वेषण प्रगतीपथावर आहे’, असे पोलिसांनी सांगितले.