रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराला आल्यावर धुळे येथील श्री. सचिन वैद्य यांना आलेल्या अनुभूती
१. शिबिराला येण्यापूर्वी
अ. ‘वर्ष २०२२ मध्ये गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात शिबिर झाले. तेव्हा शिबिराला येण्यापूर्वी १ मास माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. मला मरगळ आणि उदासीनता आली होती.
आ. शिबिराला येण्याआधी २ दिवसांपासून हळूहळू सकारात्मकता वाढत असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. शिबिराला आल्यानंतर
अ. शिबिरासाठी आल्यावर ‘सर्वच उपक्रमांमध्ये सहभाग वाढवायला हवा आणि सेवेकडे लक्ष द्यायला हवे’, असे मला वाटू लागले.
आ. ‘व्यष्टी साधनेची घडी नीट बसवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत’, या दृष्टीने विचारप्रक्रिया वाढल्याने माझे मन आनंदी राहू लागले.
इ. ‘स्वतःचे स्वभावदोष, अहं आणि संस्कार याची काळजी न करता, येणार्या आपत्काळावर मात करण्यासाठी गुरु आपले रक्षण करणार आहेत’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सांगत असतांना जोराचा पाऊस आला. तेव्हा ‘वरुणदेवाने दैवी प्रचीती दिली’, असे वाटून ‘माझ्या मनाची नकारात्मकता दूर झाली आणि ‘सकारात्मकता वाढत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
ई. या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टर आणि दत्तगुरु यांचे अस्तित्व सातत्याने सर्वत्र अनुभवता आले.’
– श्री. सचिन वैद्य, धुळे (३०.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |