ब्रिटनचे दुसरे सर्वांत मोठे शहर बर्मिंगहॅम दिवाळखोर घोषित !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे दुसरे सर्वांत मोठे शहर बर्मिंगहॅम याला दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. शहराच्या महापालिकाने दिवाळखोर झाल्याचे मान्य केले आहे. पालिकेने कलम ११४ अन्वये नोटीस बजावली आहे. यानुसार शहरात आता केवळ आवश्यक सेवांवर खर्च केला जाणार असून अन्य खर्च तत्काळ रोखण्यात आले आहेत. बर्मिंगहॅम महापालिका १० लाखांहून अधिक लोकांना सेवा पुरवते. अर्थसंकल्पातील तरतुदींपेक्षा खर्च अधिक झाल्याने दिवाळखोरीची स्थिती उद्भवली आहे.
कंगाल हुआ ब्रिटेन का दूसरा सबसे बड़ा शहर, इन खर्चों पर लगा ताला
#Britain | #Birmingham https://t.co/Cswf8FkWBc— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) September 7, 2023
संपादकीय भूमिकाभारताला २०० वर्षे लुटणार्या ब्रिटनच्या एका शहराची अशी स्थिती होणे, हा नियतीने केलेला न्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ? |