(म्हणे) ‘सनातन धर्म म्हणजे एच्.आय.व्ही. आणि कुष्ठरोग !’ – द्रमुकचे खासदार ए. राजा
उदयनिधी स्टॅलिन यांच्या एक पाऊल पुढे जाऊन द्रमुकचे खासदार ए. राजा यांचे संतापजनक विधान !
चेन्नई (तमिळनाडू) – उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेली विधाने मवाळ आहेत. त्यांनी सनातन धर्माला केवळ मलेरिया, डेंग्यू म्हटले; मात्र हे असे आजार नाहीत ज्यांना समाजात अश्लाघ्य म्हटले जाते. जर तुम्हाला सनातनची व्याख्या करायची असेल, तर एच्.आय.व्ही.कडे पहा. समाजासाठी सनातन असेच काम करत आहे. सनातनची तुलना एच्.आय.व्ही. आणि कुष्ठरोग यांसारख्या सामाजिक कलंक असलेल्या रोगांशी केली पाहिजे, असे संतापजनक विधान द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी एका कार्यक्रमात केले.
‘जैसे HIV और कुष्ठ सामाजिक कलंक, वैसा ही है सनातन’: उदयनिधि के बाद अब ए राजा के बिगड़े बोल, RJD नेता बोले- तिलकधारियों ने देश को गुलाम बनाया#ARaja #SanatanaDharma #UdhayanidhiStalin #JagdanandSingh #RJD https://t.co/sd2tG1iYiy
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 7, 2023
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी माझ्याशी वादविवाद करावा !
खासदार ए. राजा पुढे असेही म्हटले की, पंतप्रधान मोदी ‘सनातन धर्माचे पालन करा’, असे म्हणतात. सनातन धर्मात ‘समुद्र ओलांडू नये’, असे म्हटले आहे. (रामायण ५ लाख वर्षांपूर्वी घडले. त्या वेळी हनुमानाने समुद्र ओलांडला, तसेच प्रभु श्रीरामचंद्रानेही समुद्र ओलांडला होता. धर्मातील कोणते नियम कुठे लावावेत, याविषयी हिंदु धर्मात सविस्तर लिहिले आहे. त्यातील आपल्याला हवे तसे सूत्र उचलून सनातन धर्मावर टीका करणारे हिंदुद्वेषी द्रमुकवाले ! – संपादक) मोदी यांनी सनातन धर्माचे पालन करून विदेश दौर्यांवर जाऊ नये.
पंतप्रधान मोदी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन सनातनविषयी सांगण्याचा आदेश देत आहेत. मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान देतो की, त्यांनी माझ्याशी सनातन धर्मावर वादविवाद करावा. देहलीमध्ये १ कोटी लोकांना बोलवा, शंकराचार्यांनाही आमंत्रित करा.
संपादकीय भूमिका
|
बिहारमधील सत्ताधारी युती सरकारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी म्हटले की, टिळा लावून फिरणार्यांनी भारताला गुलाम केले आहे. मंदिरे बांधून किंवा मशिदी पाडून देश चालणार नाही. देशात हिंदु आणि मुसलमान अशी फूट पाडून चालणार नाही.
संपादकीय भूमिकातोंड आहे म्हणून राजकीय स्वार्थासाठी काहीही बोलणारे जन्महिंदु नेते ! देशात टिळे लावणारे आहेत म्हणून हा देश अद्याप इस्लामी देश झालेला नाही, हे जगदानंद सिंह यांनी लक्षात ठेवले पाहिजे ! |