२१ वे शतक हे आशियाचे शतक !
पंतप्रधान मोदी यांचा आसियान परिषदेत सहभाग
जकार्ता (इंडोनेशिया) – भारताच्या दृष्टीने ‘आसियान’ला (दक्षिण-पूर्व आशिया देशांच्या संघटनेला) महत्त्वाचे स्थान आहे. आसियान हा भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ (पूर्वेसाठी काम करा) धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे. आज जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात आमचे परस्पर सहकार्य वाढत आहे. आमची भागीदारी चौथ्या दशकात प्रवेश करत आहे. २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे; ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा आपला मंत्र आहे, असे उद्गार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित ‘आसियान’ परिषदेत केले.
Had a very short but fruitful Indonesia visit, where I met ASEAN and other leaders. I thank President @jokowi, the Indonesian Government and people for their welcome. pic.twitter.com/wY82TMzDvY
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2023
या वेळी परराष्ट्रमंत्री डॉ, एस्. जयशंकर हेही उपस्थित होते.