सरकारचा अध्यादेश घेऊन अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली !
आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार; मात्र आंदोलन कायम !
जालना – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालूच रहाणार आहे. त्यांच्या वतीने १ शिष्टमंडळ मुंबई येथे जाणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ७ सप्टेंबर या दिवशी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना शासनाचा अध्यादेश दाखवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ज्यांच्याकडे निजामकालीन कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्याचाच अध्यादेश घेऊन खोतकर आले होते. या वेळी त्यांच्यात चर्चा झाली.