(म्हणे) ‘उदयनिधी यांचा धर्म आणि परंपरा यांना दुखावण्याचा हेतू नव्हता !’ – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी केला पुत्र उदयनिधी यांचा बचाव !
चेन्नई (तमिळनाडू) – उदयनिधी यांच्या सनातन धर्माविषयीच्या आक्षेपार्ह विधानावर आता त्यांचे वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, उदयनिधी यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि महिला यांच्याशी भेदभाव करणार्या सनातनच्या सिद्धांतांवर विचार व्यक्त केले होते. उदयनिधी यांचा कोणताही धर्म आणि धार्मिक परंपरा यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. भाजप उदयनिधी यांचे विचार समजू शकली नाही आणि यामुळेच उदयनिधी यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवण्यात आली.
सनातन धर्म पर दिए गए उदयनिधि स्टालिन के बयान के बाद उनके पिता और तमिलनाडु के सीएम एमके स्टालिन उनके समर्थन में उतर आए हैं. #UdaynidhiStalin (@Shilpa1308)https://t.co/Ht6A5PcJ4L
— AajTak (@aajtak) September 7, 2023
संपादकीय भूमिकाउदयनिधी यांचे विधान सर्वांनी ऐकले आहे. त्यातून त्यांनी सनातन धर्माचा अवमानच केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उदनिधी यांचा बचाव करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही हिंदूंनी उदयनिधी यांना शिक्षा होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे ! |
|
सनातनद्वेषी विधाने केल्यावर उदयनिधी यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी भाजपवर टीका केली आहे. उदयनिधी म्हणाले की, भगवा पक्षाचे नेते माझे विधान मोडतोड करून सांगत आहेत. ‘मोदी आणि त्यांची कंपनी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सनातनचा वापर करत आहेत. माझ्या विधानांना ते त्यांच्या सुरक्षेचे शस्त्र मानत आहेत’, अशी टीकाही त्यांनी केली.
BREAKING | सनातन विवाद पर उदयनिधि की सफाई, ‘हम किसी धर्म के दुश्मन नहीं है, मेरे बयान का गलत मतलब निकाला गया’https://t.co/smwhXUROiK@romanaisarkhan#Sanatan #SanatanDharma #UdaynidhiStalin #TamilNadu pic.twitter.com/I7zeFKPP6m
— ABP News (@ABPNews) September 7, 2023
उदयनिधी म्हणाले की, मणीपूरमधील हिंसाचारांवरील प्रश्नांचा सामना करण्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान जगभर फिरत आहेत. गेल्या ९ वर्षांत भाजपने दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. ‘तुम्ही आमच्या कल्याणासाठी काय केले ?’, असा प्रश्न देश संघटित होऊन भाजप सरकारला विचारत आहे.
संपादकीय भूमिकाउदयनिधी यांचा द्रमुक पक्ष हिंदु धर्मविरोधी आहे, त्याची तीच विचारसरणी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनिधी यांनी केलेली विधाने सनातन धर्माच्या विरोधातच आहेत, यात कुणालाच दुमत नाही ! |