हिंदु मुलींचे मुसलमानांशी लग्न : हिंदूंसाठी धर्मयुद्ध !
१. मध्ययुगीन काळाप्रमाणे धर्मांधांकडून आजही हिंदु महिलांवर अत्याचार !
‘बीबीसी’च्या एका अहवालानुसार तरुण मुलींचा विनयभंग करून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ब्रिटनमध्ये एका टोळीच्या २० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. ते मूळचे पाकिस्तानी होते आणि ब्रिटीश आशियायी तरुण मुलींना सावज करून त्यांच्यावर बलात्कार करायचे. ‘स्वराज्य’ या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमधील मूळ पाकिस्तानी असलेल्या तरुणांच्या या टोळ्या गेली ५० वर्षे तेथील शीख मुलींना लक्ष्य करत आहेत. ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार पाकिस्तानी नेतृत्व असलेल्या या टोळ्यांनी गेल्या १६ वर्षांमध्ये अनुमाने १ सहस्र ४०० मुलींवर बलात्कार केले आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’मधील वृत्तानुसार देहलीतील शहाबाद डेअरी भागामध्ये साहिल खान या २० वर्षांच्या तरुणाने एका १६ वर्षांच्या हिंदु मुलीवर सुर्याने १६ वार केले. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार ती मुलगी साहिलशी संबंध ठेवू इच्छित नव्हती. हे सर्व वाचल्यावर ‘खरोखर भारत पुन्हा मध्ययुगीन काळात जात आहे का ?’, असा प्रश्न पडतो. मध्ययुगात जर मुसलमान आक्रमकांना एखादी मुलगी आवडली, तर कोणत्याही प्रकारे तिला प्राप्त करण्याचा ते प्रयत्न करत असत. अशाच कारणामुळे राणी पद्मिनीला चित्तोडगड येथे जोहार करावा लागला होता. भारतात अशा प्रकारच्या बहुतांश घटनांमध्ये मुलगी हिंदु असते आणि मुलगा मुसलमान असतो. ज्या मुली धर्मांतर करून लग्न करण्यास सिद्ध होत नाहीत, त्यांच्यावर अत्याचार केले जातात किंवा त्यांना ठार मारले जाते.
२. हिंदु पालकांना त्यांच्या मुलींची चिंता !
ही समस्या पुष्कळ जटील आहे. चित्रपट अभिनेते शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान वर्ष १९९० पासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय झाले. तेव्हापासून अशा प्रकारचे विवाह होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यांपैकी २ अभिनेत्यांनी हिंदु मुलींशी विवाह केला आहे. अनेक चित्रपटांमध्ये मुसलमान मुलगा हिंदु मुलीशी विवाह करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तरुण आणि निष्पाप मुलांच्या मनावर हिंदी चित्रपटांचा अत्यंत प्रभाव आहे. त्यामुळे छोट्या शहरातील मुलींना मुसलमान मुलाशी विवाह केल्याने आपण काहीतरी वेगळे करत आहोत, असे वाटते. ‘कुर्बान’ या हिंदी चित्रपटामध्ये नायक हा अफगाणिस्तानमधील एक विवाहित गृहस्थ असतो. त्यानंतर तो देहलीत मुसलमान प्राध्यापक म्हणून काम करतो आणि एका हिंदु मुलीशी विवाह करतो. या मुलीचा वापर तो अमेरिकेमध्ये स्थलांतरीत होण्यासाठी करतो. त्यानंतर तो त्याच्या पत्नीने जिहादला पाठींबा द्यावा; म्हणून तिला ‘ब्लॅकमेल’ करतो. हा चित्रपट पुष्कळ चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे; परंतु सर्वसाधारण मनुष्य या गोष्टीचा वेगळ्या दृष्टीकोेनातून विचार करतो. ‘असे आपल्या मुलीच्या संदर्भात झाले तर?’, असा विचार मुलींचे पालक करतात. आता मुसलमान मुलांची नावे कलंकित झाल्यामुळे ते हिंदु नावाने हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे हिंदु पालक त्यांच्या मुली इतर मुलांच्या संपर्कात न्यूनतम येतील, याची काळजी घेतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे अशा घरातील मुलीशी एखादा मुलगा प्रेमयाचना करतो, तेव्हा त्याचा तिच्यावर प्रभाव पडतो. पालक ही परिस्थिती योग्य तर्हेने हाताळू शकत नाहीत. त्यामुळे ती त्या प्रियकरासमवेत पळून जाण्याची शक्यता वाढते. मुलगा मुसलमान असेल, तर परिस्थिती अजूनच बिकट होते. याउलट काही मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली पालकांच्या विचारांकडे दुर्लक्ष करतात.
३. धर्मांधांचा निकाह करण्यावर अधिक भर !
विशेष विवाह कायद्यानुसार विवाह केला, तर विवाह करणार्यांपैकी कुणालाही धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही; परंतु मुसलमान तरुण ‘निकाह’ (इस्लामी पद्धतीने लग्न) करण्याचा आग्रह धरतात. काही हिंदु मुली त्यांची बाजू लावून धरतात. इतर मुली धर्मांतर केल्यावर नाव पालटतात. काही जणी धर्मांतर केल्यावरही जुनीच नावे कायम ठेवतात. उदा. काही अभिनेत्री मुसलमान धर्म स्वीकारल्यावरही हिंदु नावानेच ओळखल्या जातात.
४. हिंदु मुली मुसलमान प्रथा-परंपरांविषयी अनभिज्ञ !
अशाच एका प्रकरणामध्ये हिंदु मुलीचीही चूक असते. १८ वर्षांच्या एका गायिकेने एका नृत्य दिग्दर्शक असलेल्या मुसलमान व्यक्तीशी पळून जाऊन विवाह केला आणि ती मुसलमान बनली. अर्थात् हे लग्न तिच्या कुटुंबियांना कधीच मान्य नव्हते. त्यानंतर एका वर्षात त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता तिने अन्य हिंदु व्यक्तीशी विवाह केला आहे. अशा प्रकारच्या संबंधांमध्ये मुसलमान झाल्यावर त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ? हे जाणून घेण्यास हिंदु मुली अल्प पडतात. माझ्या एका अधिवक्ता मित्राच्या म्हणण्याप्रमाणे हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांमध्ये घटस्फोट होण्याचे कारण हिंदु मुलीचे वेगळ्या पद्धतीने संगोपन झालेले असते. हिंदु कुटुंबामध्ये मुलींना स्वातंत्र्य असते. तेथे त्यांना ‘करिअर’ बनवण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळते. मुसलमान मुलांचा अत्यंत वाईट अनुभव असतांनाही हिंदु मुली मुसलमान मुलांशी विवाह का करू इच्छितात ? याचेही संशोधन होणे आवश्यक आहे.
५. धर्मांध मुलांपासून हिंदु मुलींसमवेतच ख्रिस्ती आणि शीख मुलींनाही धोका !
१२.९.२०१२ या दिवशीच्या ‘इंडिया टुडे’ मासिकामधील वृत्तानुसार ‘केरळमधील ‘लव्ह जिहाद’ हा जागतिक स्तरावर इस्लामीकरण करण्याविषयीचा प्रकल्प आहे’, असे जागतिक भारतीय ख्रिस्ती मंडळाने म्हटले आहे. ‘वर्ष २००६ पासून अनुमाने २ सहस्र ६०० ख्रिस्ती मुलींचे इस्लामध्ये धर्मांतर करण्यात आले आहे’, असे ‘केरळ कॅथॉलिक बिशप कौन्सिल’ने म्हटले आहे. १०.१२.२००९ या दिवशी ‘इकॉनॉमिक टाइम्स’मधील वृत्तानुसार केरळमधील उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी कायदा करण्याविषयी सरकारला आदेश दिला होता. ‘वर्ल्ड शीख अलायन्स’ या संघटनेने ‘काही शक्तींकडून शीख मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी लक्ष्य केले जात आहे’, या विषयावर संशोधन सादर केले होते. मुसलमान तरुण त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी हिंदु मुलींशी विवाह करतात. वर्ष १९४० मध्ये योगी अरविंद यांनी ‘मुसलमानांना पुन्हा भारतावर राज्य करायचे आहे’, असे म्हटले होते. असे असतांनाही हिंदु-मुसलमान विवाह झाल्याच्या घटना पहायला मिळतात. अगदी उच्च वर्गातील मुसलमानाचा हिंदु मुलीशी विवाह झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात अभिनेते सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सुशीला चरक या हिंदु मुलीशी विवाह केला. आता तिचे नाव सलमा आहे. क्रिकेटपटू टायगर पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर, क्रिकेटपटू अझरउद्दीन अन् संगीता बिजलानी, शाहरुख खान आणि गौरी छिब्बर, जावेद अख्तर यांचा भाऊ सलमान आणि मोनिशा नायर इत्यादी उदाहरणे आहेत.
– सौ. मीनाक्षी शरण, देहली
(साभार : www.esamskriti.com या संकेतस्थळावरून)
(क्रमश:)
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’रूपी फोफावत असलेली विषवल्ली रोखण्यासाठी सरकारने राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा करणे आवश्यक ! |