वीजचोरी करणार्या ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
|
ठाणे, ७ सप्टेंबर (वार्ता.) – मुंब्रा येथील अमृतनगर भागातील ‘बाग ए ख्वाजा’ या इमारतीत ‘टोरेंट पॉवर’ या आस्थापनाने घातलेल्या धाडीत वीजचोरी पकडण्यात आली आहे. इमारतीतील ४३ घरांमध्ये ८ जणांच्या नावाने वीजमीटर दाखवण्यात आले होते. एकाच इमारतीमध्ये वीजचोरीची ४३ प्रकरणे लक्षात आली असून ८ जणांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. एकूण १५ लाख ९३ सहस्र रुपयांची वीजचोरी केली असल्याचे धाडीत उघड झाले आहे. (वीजचोरी करणार्यांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच असे धाडस केले जाते ! – संपादक)