(म्हणे) ‘भारताने स्वतःला हवे ते म्हणावे; मात्र ‘भारत व्यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्न !’ – ‘ग्लोबल टाइम्स’
‘भारत’ असे नामकरण करण्याच्या चर्चेवरून चीनची भारतावर टीका !
बीजिंग (चीन) – भारतात चालू असलेल्या इंडिया आणि भारत यांच्यातील चर्चेमध्ये चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटले आहे की, ‘भारताने स्वतःला हवे ते म्हणावे; मात्र ‘भारत व्यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. (‘स्वतः चीनने त्याच्या राजधानीचे नाव ‘पेकिंग’ वरून बीजिंग, तसेच ‘पूर्व तुर्कीस्थान’चे झिंजियांग असे पालटले असतांना त्याला भारताला ज्ञान देण्याचा काय अधिकार ?’, असे भारताने चीनला खडसावले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये ! चीन जगामध्ये काय करत आहे, हे जग पहात आहे ! |