जालना पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती !
जालना – जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी ४ सप्टेंबर या दिवशी कार्यभार हाती घेतला. ‘सर्वसामान्य माणूस म्हणून मी काम करतो. मी अंतरवाली सराटी या गावात जाणार असून आंदोलक मनोज जरांगे यांना भेटणार आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झालेले मतभेद दूर करणार आहे’, असे ते म्हणाले.