उल्हासनगर येथील मटका आणि जुगार यांच्या अड्ड्यांवर धाडी !
समाजाला व्यसनाधीन करणार्या संबंधितांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
ठाणे, ६ सप्टेंबर (वार्ता.) – उल्हासनगर येथील मध्यवर्ती आणि हिललाईन पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी मटका, गुडगुडी, सोराट, कल्याण मटका, मांगपत्ता जुगार यांच्या अड्ड्यांवर धाडी घालून २२ जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम हस्तगत केली आहे. उल्हासनगर येथे गर्दीच्या ठिकाणी हे अड्डे उघडपणे चालू असल्याची टीका होत होती.