हे प्रभो, नैवेद्य हा स्वीकारावा, हीच आर्त प्रार्थना ।
एकदा रत्नागिरीहून येतांना आईने गुरुदेवांसाठी आंबे आणले होते. ते मी त्यांना नैवेद्य स्वरूपात दिले. त्या वेळी माझा पुष्कळ भाव जागृत होऊन मला आपोआप एक कविता सुचली.
साल म्हणे वासुदेवाला ‘धन्य मी झाले ।
झाला तव करस्पर्श मजला’ ॥ १ ॥
आंब्याची फोड म्हणे नारायणाला ।
पूर्ण होऊ दे तव भेटीची ओढ ॥ २ ॥
मुखात जायी श्रीहरीच्या ।
गोड गोड आंब्याची फोड ॥ ३ ॥
फोडीत भरला गोडवा तव भक्तीचा ।
गोड रस गळतो हा अमृततत्त्वाचा ॥ ४ ॥
फोडीतील गोडव्याला ना कशाची तुलना ।
हे प्रभो, नैवेद्य हा स्वीकारावा, हीच आर्त प्रार्थना ॥ ५ ॥
– कु. अपाला औंधकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.५.२०२२) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |