अंबरनाथ येथे वीज मंडळाच्या भरारी पथकातील लाचखोर अधिकार्यासह तिघे कह्यात !
लाच घेतल्याविना कामे न करणार्यांना बडतर्फच करायला हवे !
ठाणे, ५ सप्टेंबर (वार्ता.) – वीजचोरी करणार्या ग्राहकाचा ३ ते ४ लाख रुपयांचा दंड रहित करणे आणि देयकात तडजोड करून देणे यांसाठी ७५ सहस्र रुपयांची लाच मागणार्या वीज मंडळाच्या भरारी पथकातील लाचखोर अधिकार्यासह तिघांना कह्यात घेण्यात आले. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली.
वीज वितरण कार्यालयात साहाय्यक पदावर कार्यरत असलेले अभियंते हेमंत गोविंद तिडके यांसह अंबरनाथ येथील कनिष्ठ लिपिक सागर ठाकूर, पांडुरंग सूर्यवंशी आणि नितीन साळवे यांना कह्यात घेण्यात आले. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक)