बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती !
बेळगाव – कर्नाटक सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकार्यांचे स्थानांतर केले असून भीमाशंकर गुळेद यांची बेळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते वर्ष २०१२ चे कर्नाटकातील ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. बेळगाव हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असून तो संवेदनशील आहे.