तुर्भे (नवी मुंबई) येथे ६० लाखांच्या विदेशी बनावट मद्याचा साठा जप्त !
ठाणे, ५ सप्टेंबर (वार्ता.) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने नवी मुंबई येथील तुर्भे भागातून बनावट विदेशी मद्याची तस्करी करणार्या मध्यप्रदेश येथील तेरसिंग कनोजे (वय ३२ वर्षे) याच्यासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६० लाख रुपयांच्या विदेशी बनावट मद्यासह २ भ्रमणभाषसंच आणि एक १२ चाकी ट्रक असा एकूण ७४ लाख ८ सहस्र ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संपादकीय भूमिकाबनावट साठा बाळगणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |