‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप करतांना मन संपूर्ण निर्विचार होऊन स्‍वतःचे अस्‍तित्‍व न जाणवणे

सौ. संगीता चव्हाण

‘२१.१.२०२१ या दिवशी सकाळी मी रामनाथी, गोवा  येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरामध्‍ये नामजपाला बसले होते. त्‍या वेळी ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप सर्वांना करण्‍यास सांगितला होता. थोड्या वेळाने मला माझ्‍या हृदयमंदिरामध्‍ये गुरुदेव श्रीकृष्‍णाच्‍या रूपात सिंहासनावरती बसलेले दिसत होते. मी त्‍यांच्‍या चरणांवर नामजप अर्पण करत होते आणि ‘हे गुरुदेव, माझे षड्‍रिपू तुमच्‍या चैतन्‍याने गळून जाऊ देत. माझ्‍यात दैवी गुणांची वृद्धी होऊ दे. मी हे षड्‍रिपू घालवण्‍यासाठी असमर्थ आहे’, अशी प्रार्थना झाली. थोड्या वेळाने ‘प.पू. गुरुमाऊलींच्‍या चरणातून पांढरा प्रकाश माझ्‍या आज्ञाचक्रामध्‍ये जात आहे आणि तो संपूर्ण शरिरामध्‍ये पसरत आहे’, असे दृश्‍य मला ५ मिनिटे दिसत होते. त्‍या वेळी माझे मन संपूर्ण निर्विचार झाले होते. मला स्‍वतःचे अस्‍तित्‍व जाणवत नव्‍हते. एक वेगळीच स्‍थिती मला अनुभवता येत होती. नंतर सहसाधिकेने कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यास सांगितले. तेव्‍हा मी भानावर आले. त्‍या वेळी मला पुष्‍कळ हलके आणि शांत वाटत होते.’

– सौ. संगीता चव्‍हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक