मिरज येथील पुरातन श्री माधवजी मंदिरात गोकुळाष्टमीच्या निमित्त विविध कार्यक्रम !
मिरज – ६ आणि ७ सप्टेंबर या दिवशी मिरज येथील पुरातन श्री माधवजी मंदिरात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात सांगली येथील ह.भ.प. अपर्णा पटवर्धन यांचे सुश्राव्य कीर्तन, गोपाळकाला, महाप्रसाद, दहिहंडी स्पर्धा, लहान मुलांसाठी श्री राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा यांचा समावेश आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गोपाळराव पटवर्धन सरकार, भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री ओंकार शुक्ल, श्रीसेवक श्री. सचिन भोसले यांनी केले आहे.
२०० वर्षांहून अधिक काळ अनेकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर !
मिरज येथील किल्ल्यातील हे पुरातन मंदिर वर्ष १७९९ पूर्वी तत्कालीन सांगली संस्थानच्या श्रीमंत गंगाधर बाळासाहेब पटवर्धन यांनी बांधले. या मंदिरात श्री माधवजी, श्रीलक्ष्मी आणि गरुड यांच्या मूर्ती आहेत. गेल्या २०० वर्षांहून अधिक काळ हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.