आम्हाला युद्ध नको आहे ! – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर यांचे काश्मीरवरून विधान !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला काश्मीरचा प्रश्न शांततेने सोडवायचा आहे; मात्र जर शांतता प्रस्थापित झाली नाही, तर ती भारत, पाकिस्तान आणि जगासाठी चिंतेची गोष्ट असेल, असे विधान पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याखोरीज भारतासमवेत व्यापार करणे शक्य नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापार करणे बंद केले आहे.
संपादकीय भूमिका
|