स्वीडनमध्ये कुराण जाळल्यानंतर पुन्हा हिंसाचार
स्टॉकहोम – स्वीडनमध्ये कुराणाच्या प्रती जाळण्याचे प्रकार चालूच आहेत. आता स्वीडनचे तिसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या मालमो येथे कुराण जाळल्यानंतर पुन्हा हिंसाचार झाला. मालमो शहरातील रोजेनगार्ड परिसरात इस्लामला विरोध करतांना सलवान मोमिका याने कुराणाची प्रत जाळली. त्यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली.
कुरान जलाए जाने के बाद स्वीडन में फिर बवाल! माल्मो शहर में फूंकी गईं गाड़ियां, जमकर पत्थरबाजीhttps://t.co/HDIr67Nnf5
— Jansatta (@Jansatta) September 4, 2023
या हिंसाचारात अनेक गाड्या आणि इमारती यांची हानी झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पेट्रा स्टॅनकुला म्हणाले की, आम्ही लोकांच्या भावनांचा आदर करतो; परंतु हिंसाचार करण्याची अनुमती कुणालाही नाही.’