मीरारोड (जिल्हा पालघर) येथे पोलिसावर आक्रमण करून आरोपीचे पलायन !
मुंबई – पालघर जिल्ह्यातील मीरारोड येथील मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात आरोपीने पोलिसावर जीवघेणे आक्रमण करून पलायन केले. जयकुमार राठोड असे घायाळ पोलिसाचे नाव असून उपचारासाठी त्यांना येथील ‘वोक्हार्ड’ रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली.
भ्रमणभाष चोरीच्या प्रकरणात या आरोपीला अटक झाली होती. आरोपीच्या हातात बेड्या घालून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्या समवेत २ पोलीस होते. एक पोलीस जेवण आणण्यासाठी गेला असतांना आरोपीने राठोड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने फटका मारला. आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही. गुन्हे अन्वेषण शाखेकडून आरोपीचा शोध चालू आहे.
संपादकीय भूमिका :सामान्य आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस कुख्यात गुंडांना कसे सामोरे जाणार ? |