सातारा बंदला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
सातारा, ४ सप्टेंबर (वार्ता.) – अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. लाठीमार करणार्या पोलीस आणि प्रशासन यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा बंदची हाक देण्यात आली. या सातारा बंदला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Maratha Reservation | सातारा जिल्हा आज बंद | Marathi Newshttps://t.co/aCknRMcNY5#Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra #MarathaReservation #MarathaProtest
— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) September 4, 2023
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवतीर्थावरील (पोवई नाक्यावरील) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अंतरवाली सराटी येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.