संस्कृत नाट्य स्पर्धेत अमरावती येथील कु. संहिता भारतीय (वय ९ वर्षे) हिला प्रथम पारितोषिक !
अमरावती – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक आणि बाल रंगभूमी परिषद, नागपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय संस्कृत बाल नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी स्वर्गीय सुरेश भट सभागृह, रेशीम बाग, नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत अमरावती विभागातून अंतिम फेरीत पोचलेल्या ‘नारायणा विद्यालयम्’च्या ‘बुभुक्षित’ या संस्कृत नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात याच नाटकातील बालकलाकार, तसेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. संहिता विलोभ भारतीय (वय ९ वर्षे) हिला तिने केलेल्या अभिनयासाठी पारितोषिक मिळाले आहे. या नाटकाला नेपथ्य आणि दिग्दर्शन यांसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कु. संहिता भारतीय ही सनातनचे संत पू. रत्नाकर मराठे यांच्या भावाची नात आहे.