भिवंडी येथील रुग्‍णालयाची अपकीर्ती करण्‍याची धमकी देत खंडणी मागणारे धर्मांध अटकेत !

ठाणे, ४ सप्‍टेंबर (वार्ता.) – भिवंडी येथे एका यूट्यूब वाहिनीच्‍या ३ कथित पत्रकारांनी एका खासगी रुग्‍णालयाची अपकीर्ती करणारे लिखाण करून त्‍याचा व्‍हिडिओ सिद्ध केला. हा व्‍हिडिओ प्रसारित करण्‍याची धमकी देत रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थापकाकडे २५ सहस्र रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाणे येथे खंडणीसह विविध कलमांन्‍वये इमरान, सोहेल आणि नियाज शेख यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद केला आहे. (लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍यांक असलेले धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍यांक ! – संपादक)

रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थापकाने खंडणीची रक्‍कम न दिल्‍याने खासगी रुग्‍णालयाविषयीचा व्‍हिडिओ ‘लाईफ इन भिवंडी’ या यूट्यूब वाहिनीवर आणि सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित केल्‍याचे आधुनिक वैद्यांनी दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांची कारवाई झाल्‍यावर संबंधितांनी यूट्यूब वाहिनीवरून हे चित्रीकरण काढून टाकले आहे.

भिवंडी येथे असे बरेच ‘यूट्यूबर’ (यूट्यूब’वर विविध व्‍हिडिओ बनवणारे) आहेत, जे बनावट वृत्तवाहिनी चालू करून बातम्‍यांसारखे चित्रीकरण प्रसारित करतात आणि व्‍यावसायिकांकडून खंडणी मागण्‍याचा धंदा करतात. विविध पत्रकार संघटनांनी यापूर्वीच अशा व्‍यक्‍तींवर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा खंडणीखोरांना कठोरात कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !