लाठीमाराचा आदेश मंत्रालयातून दिला नाही ! – फडणवीस
मुंबई – पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पातळीवर लाठीमार करण्याचा अधिकार असतो. मराठा आरक्षणाची मागणी करणार्यांवर लाठीमार करण्याचा आदेश मंत्रालयातून देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे स्थानांतर करण्यात आले असून याप्रकरणी सखोल चौकशीचा आदेश सरकारकडून दिला आहे.