संभाजीनगर येथे तरुणाने स्वत:चीच दुचाकी पेटवली !
छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यावे; म्हणून राज्यभरात चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते अनिल पाटील बनकर यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ४ सप्टेंबर या दिवशी स्वतःची दुचाकी पेटवून दिली, तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सिल्लोड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मराठा मोर्चा समन्वय समितीचे सर्व मराठा बांधव आणि सत्ताधारी अन् विरोधी पक्षात असलेले मराठा समाजाचे नेते या बंदमध्ये सहभागी झाले होते.