जालन्याच्या घटनेची अपर पोलीस महासंचालकडून चौकशी ! – मुख्यमंत्री
बुलढाणा – जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्याकडून चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ सप्टेंबर या दिवशी केली. जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देऊन ४ सप्टेंबर या दिवशी बुलढाणा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘जालना येथील आंदोलन शांततापूर्ण मार्गाने चालू असतांना नक्की दगडफेक कुणी केली ? हे आता येत असून मराठा आंदोलनाच्या आडून कुणी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे, तेही लवकरच कळेल.’’