नायजेरियात इस्लामी आक्रमणकर्त्यांकडून नमाजपठण करणार्यांवर गोळीबार : ७ ठार
अबूजा (नायजेरिया) – नायजेरियाच्या कडुना राज्यातील एका मशिदीत नमाजपठण करणार्यांवर इस्लामी आक्रमणकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. ‘सशस्त्र आक्रमणकर्त्यांच्या टोळ्यांनी गेल्या ३ वर्षांत नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम भागात सहस्रावधी लोकांचे अपहरण केले असून शेकडो जणांना मारले आहे’, असे एका अहवालात म्हटले आहे.