चांदवड (जिल्हा नाशिक) येथे जनआक्रोश मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
चांदवड (जिल्हा नाशिक) – ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे आमदार श्री. नीतेश राणे यांच्या प्रमुख सहभागासह सहस्रो हिंदू सहभागी होते. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा मोर्चा पोचल्यावर तेथे धर्मसभा घेण्यात आली. या मोर्चात अनेक साधू-संत सहभागी झाले होते. भगव्या टोप्या, भगवे झेंडे यांमुळे चांदवड भगवेमय झाले होते. मोर्चात महिला-युवती यांचाही लक्षणीय सहभाग होता.