महाड (रायगड) येथील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट !
गोतस्करी आणि गोरक्षकांवर होणारी आक्रमणे यांच्या निषेधार्थ पोलिसांसमवेत चर्चा !
महाड (रायगड) – जिल्ह्यात होणारी गोतस्करी आणि गोहत्या आटोक्यात आणण्यासाठी, त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, कसाई अन् गोतस्कर यांच्याकडून हिंदु गोरक्षक आणि कायदेशीर कारवाई करायला येणारे पोलीस प्रशासन यांच्यावर होणारी आक्रमणे, जीविताला निर्माण होणारा संभाव्य धोका, वाढती धार्मिक तेढ, वाढता जातीवाद आणि राजेवाडी (महाड) येथील हिंदू आणि पोलीस यांच्यावर करण्यात आलेले भ्याड आक्रमण या सर्वांच्या निषेधार्थ अन् या विषयांवर चर्चा करण्यासाठी गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. या वेळी हे सर्व रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांना निवेदनही देण्यात आले.