अटकेत असलेला अमली पदार्थांचा तस्कर निघाला पाकचा हेर !
पाकमधून मागवल्या होत्या २ ‘एके-४७’ रायफली !
पतियाळा (पंजाब) – येथील मध्यवर्ती कारागृहात असलेला अमर सिंह हा आरोपी भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ला पाठवत होता, अशी माहिती मिळाल्यानंतर आता पोलीस त्याला या प्रकरणी चौकशीसाठी कह्यात घेणार आहेत. अमर सिंह पाकमध्ये आय.एस्.आय.च्या शेर खान नावाच्या व्यक्तीला माहिती पाठवत होता.
पटियाला सेंट्रल जेल में बंद तस्कर निकला ISI एजेंट: पाकिस्तान भेजी आर्मी की खुफिया जानकारी वाली PDF;
https://t.co/CetTdzdmur— गाज़ियाबाद365 (@Ghaziabad365) September 2, 2023
अमर सिंह याला तस्करीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. जून मासापासून तो या कारागृहात होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या भ्रमणभाष संचाची तपासणी केल्यानंतर तो आय.एस्.आय.ला माहिती पुरवत असल्याचे उघड झाले. अमर सिंह याने शेर खानकडून २ ‘एके-४७’ रायफली आणि २५० काडतुसे मागवली होती.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |