हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती
काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध
हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) – येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास हुब्बळ्ळी-धारवाड महानगरपालिकेने अनुमती दिली आहे. यापूर्वी याला काँग्रेस सरकारकडून विरोध करण्यात आला होता. वर्ष १९९४ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात राष्ट्रप्रेमींनी या मैदानात राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता. यात ५ राष्ट्रप्रेमींचा मृत्यू झाला होता. सध्या या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेने दिलेल्या या अनुमतीला काँग्रेस आणि एम्.आय.एम्. या पक्षांच्या नगरसेवकांकडून विरोध करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाभारत धर्मनिरपेक्ष देश असतांना ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय पक्ष विरोध करतात, हे लक्षात घ्या ! |