धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करा !
उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्वर सिंह यांनी धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करण्याची मागणी केंद्रीय कायदामंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.
धार्मिक ग्रंथों की सुरक्षा पर राजेश्वर सिंह ने रख दी ये मांग, सीएम योगी व कानून मंत्री को लिखा पत्र
#RajeshwarSingh #UPPoliticshttps://t.co/S3eTXLa3FM
— Zee News (@ZeeNews) September 2, 2023
डॉ. राजेश्वर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात अनेक उदाहरणे आहेत, ज्यात धर्मग्रंथांवर आक्रमण करण्यात आले, त्यांची टिंगल करण्यात आली. अशा घटना देशाच्या सामाजिक अखंडतेवर आघात करत असतात. वर्तमानात देशात धार्मिक ग्रंथांचे महत्त्व समजून घेणारा आणि ‘त्यांचा होणारा अवमान गुन्हा आहे’, असे ठरवणारा एकही कायदा नाही. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे.
संपादकीय भूमिकाभारतात धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा नसणे, हे लज्जास्पद ! |