नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्या ६ नायजेरियन महिला कह्यात !
नवी मुंबई – वाशी मधील जूहगाव येथील एका उपाहारगृहातून ड्रग्स विकणार्या ६ नायजेरियन महिलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. तरुण-तरुणींना अमली पदार्थ पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी ही कारवाई केली.
Navi Mumbai Police Conduct Raids, Apprehend 75 Nigerian Nationals in Drug and Immigration Crackdown Worth ₹2 Crore#Cocaine #Drug #Maharashtra #Mumbai #MumbaiMetroNews #MumbaiPolice #Nigerians #Raidhttps://t.co/SrrtxQdA0X
— Mumbai Metro Times (@mumbaimetrotime) September 2, 2023
गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. ज्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे, अशांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी १५ पेक्षा अधिक विदेशी नागरिकांना कह्यात घेतले आहे. यात सर्वाधिक नागरिक हे आफ्रिका खंडातील देशांचे आहेत.
आतापर्यंत ७०० ग्रॅम कोकेन, ३०० ग्रॅमपेक्षा अधिक एम्.डी., ३०० किलो ट्रामाडॉल हायड्रोक्लोराइड जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे.
संपादकीय भूमिकाआरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल ! |