अनधिकृत फलक हटवण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गल्लीबोळातील कचर्यावरून महापालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेसमवेतच अनधिकृत फलक हटवण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे महापालिकेने ठरवले आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व अधिकार्यांना दिले आहेत.
मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसणार नाही, याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरित हटवा’, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.