वणी (यवतमाळ) येथे गोवंशियांच्या मांसविक्री प्रकरणी ३ धर्मांधांना अटक !
वणी (यवतमाळ), २ सप्टेंबर (वार्ता.) – येथील मोमीनपुर्यात १ सप्टेंबर या दिवशी गोवंशियांच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशानुसार धाड घालून पोलिसांनी ५५० किलो गोवंशियांचे मांस जप्त केले आणि ३ धर्मांधांना अटक केली. घरातच गोवंशियांची कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याचे अन्वेषणातून उघड झाले. संबंधित आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आले. (कायद्याची तीळमात्रही भीती नसलेले धर्मांध आणि गोवंश हत्याबंदीची कठोर कारवाई करण्यास कचरणारे पोलीस प्रशासन यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. – संपादक)