अंबरनाथ येथे इमारतीचा सज्जा कोसळून १ महिला ठार, तर १ जण घायाळ
ठाणे, २ सप्टेंबर (वार्ता.) – अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसर्या मजल्यावरील एका खोलीचा सज्जा २ सप्टेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत गीता गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एका कुटुंबातील सदस्य घायाळ झाला आहे. घायाळ झालेल्यावर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.