मुंबईत विदेशी मद्याचा १ कोटी रुपयांचा साठा जप्त !
मुंबई – गोवा राज्यातील मद्य छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या तिघांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंदवला. या प्रकरणी विदेशी मद्याचा १ काेटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. वसई-दिवा रेल्वे पुलाजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. या वेळी ट्रकसह १ कोटी १६ लाख ४५ सहस्र किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :छुप्या मार्गाने मद्य मुंबईत येऊ देणार्यांवरही कारवाई करायला हवी ! |