‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’ मोहिमांमुळे भारत बलशाली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – ‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’च्या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे, तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावले उचलता येतील. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणार्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून ‘वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य देश’ अशी ओळख निर्माण झाली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पुणे येथील ‘आयुका’ संस्थेचा संशोधन उपकरण निर्मितीत सक्रीय सहभाग अभिमानास्पद असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या मोहिमेमध्ये सहभागी शास्त्रज्ञांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनही केले.