‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी !
महाराष्ट्र कामगार सेनेची मागणी
तासगाव (जिल्हा सांगली) – जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हे सर्वच स्तरांतील हिंदूंसाठी आदर्श आहेत. हिंदूबहुल असलेल्या या देशात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आणि भगवद्गीता हे शाळा अन् महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमात आले पाहिजेत. असे झाल्यास समाजात परत एकता नैतिकतेचे अधिष्ठान निर्माण होईल. तरी ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’च्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार यांना देण्यात आले. या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्थित होते. (शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन ! – संपादक)