रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. मुन्ना कुमार शर्मा (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा) नवी देहली.

अ. ‘आश्रमात सतत पालट झाल्याचे दिसून येतात.

आ. गुरुदेव डॉ. आठवले आणि देवता यांच्या कृपेने आश्रमात आध्यात्मिक वातावरणाचा विस्तार सतत होत आहे.’

२. श्री. अजित सिंह बग्गा (राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडळ आणि अध्यक्ष वाराणसी व्यापार मंडळ), सिगरा, वाराणसी

अ. ‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.

आ. पुनःपुन्हा येथे येण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे.

इ. आश्रमात जे कुणी भक्तगण आहेत, त्यांचे समर्पण प्रशंसनीय आहे.

ई. चांगली वर्तणूक (व्यवहार), सेवा आणि तळमळ यांसह प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगणे ही गोष्ट अत्यंत प्रशंसनीय आहे.’

३. अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, आंध्रप्रदेश.

अ. ‘रामनाथी आश्रमात फारच चांगले वाटले.

आ. आपले कार्य प्रशंसनीय आहे.

इ. अध्यात्मावरील संशोधन युवावर्गाला प्रेरित करील.’

४. श्री. निधीश गोयल (संचालक, जम्बू टॉक्स), जयपूर, राजस्थान.

अ. ‘या वेळी मला गोव्यातील समुद्रकिनार्‍यावर जाण्याची इच्छा झाली नाही. ‘मंदिरे आणि आश्रम स्थानावरच रहावे’, असे वाटले.’

५. श्री. वीरेश त्यागी (राष्ट्रीय कार्यालय मंत्री, अखिल भारत हिंदु महासभा) बिजनौर, उत्तरप्रदेश. 

अ. ‘आश्रमात येताक्षणीच गुरुजींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद लाभतो. आणखी जेवढ्या वेळा मी आश्रमात येईन, तेवढ्या वेळा मला त्यांचे अधिक आशीर्वाद लाभतील.’


सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेला अभिप्राय 

१. ‘हे प्रदर्शन पाहिल्यानंतर अध्यात्मात आणि ईश्वराचे स्मरण करत समर्पित झाल्यावर आपले प्रत्येक ध्येय साध्य होऊ शकते.’ – श्री. अजित सिंह बग्गा, सिगरा, वाराणसी.

२. ‘या क्षेत्राविषयी मला काहीच ज्ञान नव्हते. आता माझी उत्सुकता वाढली आहे.’ – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, हैदराबाद, आंध्रप्रदेश.

३. ‘हे प्रदर्शन पाहून माझ्यामध्ये सूक्ष्मातून एक सकारात्मक प्रवाह जातांना मला जाणवला.’ – श्री. शशिकांत दुबे (जिल्हा सचिव, ब्राह्मण सभा) जिल्हा दुर्ग, छत्तीसगड.

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.६.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.